Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओ

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2023 (07:26 IST)
facebook
सोशल मीडियावर रिल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाली गुरवबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपला चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याची तक्रार तिने पोलिसात दाखल केली आहे.
 
सोनाली गुरव ही इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय असते. नुकतंच तिने या घडलेल्या प्रकाराबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
 
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. काही मित्रांचा फोन आला कि एक अश्लील मॉर्फ विडीओ सध्या वायरल होतोय. पायाखालची जमीन सरकली. पटकन सगळं सोडून कुठेतरी निघुन जावसं वाटलं. वाईट वाईट विचार येऊ लागले. हि घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या.
 
सगळं काही छान सुरु असताना एखाद वादळ येऊन सगळं उध्वस्त करून जातं. अगदी तसच वाटलं. आणि सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. लोकांना चर्चेला, मजा मारायला नवीन विषय मिळाला. खरंच एवढा वेळ आहे लोकांकडे? हि वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते आणि मग तेव्हा आपण असेच react करणार आहोत का? याची जाणीव कशी नाही होत.
 
काही दिवस घाबरत कसेबसे दिवस ढकलू लागले पण नंतर घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणीनी मानसिक बळ दिलं. आणि मी पोलीस स्टेशन गाठलं. कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीच चढू नये असं मला नेहमी वाटत. पण त्याउलट पोलिसात गेल्या गेल्या पोलिसांनी मला सहकार्य केलं आणि लगेच हालचाली सुरु झाल्या. पोलीस झपाट्याने हे कृत्य करणाऱ्याना आणि ते पसरवायला मदत करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. मला पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
 
फक्त खंत हीच आहे. कि आपला समाज एवढा विकृत कसा काय झाला? कुठून येते हि विकृती. १६-१७ वयाची लहान लहान पोरं देखील अश्लील केमेंट मेसेज करतात तेव्हा चीड येते. स्वतःच्याच समाजात वावरण्याची भीती वाटते. पण आता ठरवलं आहे मी जशी हि घटना झाल्यानंतरही माझ्या चाहत्यांचं, हितचिंतकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही त्यापेक्षा दुपटीने मेहनत करून तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करत राहीन. लवकरच अश्लीलता नसलेल्या, जज न करणाऱ्या समाजात मी आणि माझ्यासारख्या अनेक मुली बागडतील हीच स्वामींचरणी प्रार्थना”, अशी पोस्ट सोनालीने केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Lal Bahadur Shastri Death Anniversary:लाल बहादुर शास्त्री पुण्यतिथी

Ram Mandir 2025 Anniversary Wishes अयोध्यात श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा संदेश मराठी

रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

सततच्या विमान अपघातांमुळे नागपूर विमानतळ झाले सतर्क, पक्षी आणि पाळीव प्राण्यांना प्रवेश बंदी!

LIVE: मुंबईतील जुहू परिसरात चार बांगलादेशी नागरिकांना अटक

पुढील लेख