Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्याहून मुंबईला जात असतांना तरुण अडखळून खड्ड्यात पडला, मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले

Webdunia
शनिवार, 27 जुलै 2024 (10:14 IST)
मुंबई:  ठाण्यासह महाराष्ट्राच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण रस्ते जलमय झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर फक्त खड्डेच दिसत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. ठाण्यात खड्ड्यांमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 
 
ठाण्यातील शीळ डायघर संकुलात खड्ड्यामुळे 22 वर्षीय सागर मिसाळ याचा मृत्यू झाला. गुरुवार-शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास सागर कल्याण शिळ रस्त्यावरून नवी मुंबईच्या दिशेने दुचाकीने जात होता. यावेळेस खड्ड्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दुचाकीवरून पडला. मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. गंभीर जखमी सागरला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा गुन्हा दाखल केला होता, मात्र सीसीटीव्ही तपासल्यानंतर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तापास पोलीस करीत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गळा दाबून खून, मृतदेहाचे मिक्सरमध्ये तुकडे बारीक केले, या मॉडेलच्या नवऱ्याने हद्द ओलांडली!

कल्याणमध्ये गोरक्षक महासंघाच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून मारहाण, गोमांसाचा ट्रक जप्त केल्याने आरोपी संतप्त

महाविकास आघाडीत जागावाटपावरून खडेजंगी, शरद-उद्धवांच्या मागणीने काँग्रेस नाराज

आता मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्या हस्ते बो-स्ट्रिंग आर्क ब्रिजचे उद्घाटन

राज्यमंत्री आत्राम यांच्या मुलीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments