Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेविरुद्ध भारत दाखल करणार 16 खटले

Webdunia
नवी दिल्ली- जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) करार न मानणार्‍या अमेरिकेविरूद्ध भारत 16 खटले दाखल करणार आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेचे काही कार्यक्रम जागतिक नियमांविरूद्ध आहेत अशी माहिती सरकारतर्फे संसदेत मांडण्यात आली.
 
जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचे पालन न केल्यामुळे भारत अमेरिकेविरुद्ध 16 खटले दाखल करणार आहे का? असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. त्यावर वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे सत्य आहे, असे उत्तर दिले.
 
अमेरिकेचे अक्षय ऊर्जा क्षेत्रात असे काही कार्यक्रम आहेत, जे जागतिक नियमांना मोडणारे आहेत असे भारताला आढखले असल्याचे सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले. विशेषत: ‘गॅट 1994’ अंतर्गत येणारे नियम अमेरिकेने मोडले आहेत अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
 
भारताने या प्रकरणी विवाद निवारण पॅनलच्या अहवाल आणि शिफारसींनुसार जागतिक व्यापार संघटनेत तक्रार दाखल केली असल्याची माहितीही सीतारामन यांनी दुसर्‍या एका उत्तरात दिली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments