Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

...तर प्रतिहल्ला करू: राजनाथ सिंह

Webdunia
मंगळवार, 28 जुलै 2015 (09:53 IST)
नवी दिल्ली- ‘आम्ही स्वत:हून कोणावरही हल्ला करणार नाही. मात्र कुणी आमच्यावर चालून आले तर आम्ही सडेतोड उत्तर देऊ. पाकिस्तानशी आम्हाला शांतता हवी आहे पण देशाच्या सुरक्षेशी, सन्मानाशी कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही’, असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला दिला. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी.के. पाठक यांच्याशीही सकाळीच चर्चा करून भारत-पाक सीमेवर गस्त वाढवण्याचे आदेश त्यांनी दिले. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात असून लवकरच हे ऑपरेशन यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘एकीकडे शेजारी देशाशी संबंध सुधारत आहेत, असा माहोल तयार होतो आणि त्याचवेळी सीमेपलीकडून दहशतवादी घुसखोरी करतात. हे असे का घडते, हेच कळत नाही. अशा कुरापती आम्ही खपवून घेणार नाही’, असे राजनाथ यांनी ठणकावले.
सर्व पहा

नक्की वाचा

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

Show comments