Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दर्शन द्यायला मोदी देव आहेत काय- मल्लिकार्जुन खरगे

Webdunia
गुरूवार, 24 जुलै 2014 (11:21 IST)
दर्शन द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव झाले आहेत काय? असा सवाल काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत केला. त्यानंतर एकच हशा पिकला.  

पंतप्रधानांच्या गैरहजेरीचा मुद्दा मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत उपस्थित केला.आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मोदींनी किमान आठवड्यातून एक दिवस तरी संसदेत हजेरी लावली पाहिजे, असे खरगे यांना सांगायचे होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी स्वराज यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. खरगे यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीवरून तक्रार केली होती. परंतु पंतप्रधान प्रश्नोत्तराच्या तासांत सभागृहात होते. तुम्हाला त्यांचे दर्शन झालेही होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर खरगे म्हणाले,  दर्शन द्यायला मोदी काही देव नाहीत. खरे तर त्यांनी आठवड्यातून एकदा तरी सभागृहात असावे. एवढेच मला  म्हणायचे होते.
सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

Show comments