Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधानांच्या पत्नीलाही वाटते जीवाची भीती

Webdunia
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (12:40 IST)
गांधीनगर- मला न्याय हवा आहे. 46 वर्षांपूर्वी त्यांच्याशी मी विवाह केला होता. त्यांच्यासोबत मी दोन वर्षे काढली आहेत. आता मात्र मला माझ्या जीवाची भीती वाटते. माझ्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांकडूनच माझी हत्या होईल, असे वक्तव्य जसोदाबेन नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
 
पंतप्रधानांच्या पत्नींना असलेले अधिकार, सुरक्षा व्यवस्था, राजशिष्टाचार, सुविधा आदींची माहिती जसोदाबेन मोदी यांनी मेहसाणाचे पोलीस अधीक्षक जे आर मोथालिया यांच्याकडे माहिती अधिकार अतंर्गत मागवली. त्यांनी गुजरातीत लिहिलेले तीन पानांचे पत्र मोथालिया यांच्याकडे दिले.
 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी हत्या केली होती. त्यामुळे मला सुरक्षा रक्षकांची भीती वाटते. माझ्या नियुक्तीसाठी तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या तैनातीची प्रत मला दिलेली नाही. माझ्या सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या आदेशाची प्रमाणित प्रत माला दिली जावी, अशी मागणी जसोदाबेन यांनी केली.
सर्व पहा

नक्की वाचा

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

Show comments