Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फाइटमध्ये द ग्रेट खली गंभीर जखमी, आयसीयूत

Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2016 (14:33 IST)
भारताचा महाशक्तिशाली रेसलर दि ग्रेट खली उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या रेसलिंग इवेंटमध्ये गंभीर जखमी झाला आहे. जखमी झाल्यावर त्याला हल्द्वानीच्या बृजलाल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथून त्याला हेलिकॉप्टर ने डेहराडून हालवण्यात आले आहे.
खलीवर उपचार करत असलेले चिकित्सकांनी सांगितले की त्याच्या छाती, मान आणि डोक्यावर जबर मार बसला आहे. दरम्यान खलीला एम्बुलेंसहून उतरवण्यात स्टॉफला जाम घाम फुटला. 12 ते 14 कर्मचारी मिळूनदेखील त्याला उचलू पावले नाही. शेवटी खली स्वत: हिंमत करून उतरला.

उत्तराखंडातील हल्द्वानीमध्ये ‘द ग्रेट खली रिटर्न्स’ शो मध्ये खलीची वापसी होणार होती. खलीला अनेक कुस्तीपटूंशी भिडायचे होते. पण जेव्हा खलीसोबत कॅनडाचे रेसलर ब्रॉडी स्टीलची फाइट होत होती तेव्हा माइक नॉक्स आणि अपोलो मैदानात उतरले. सुरुवातीला खली तिघांनाही भारी पडला पण काही वेळानंतर त्या तिघांनी मिळून खलीवर खुर्ची आणि लाथाबुक्क्यांनी डोक्यावर,छातीवर,मानेवर,आणि पाठीवर जोरदार प्रहार केले. यानंतर रेफरी ने मॅच रद्द केला.
खली खाली पडत्याक्षणी दर्शकांनी खूप हल्ला केला आणि विदेशी कुस्तीपटूंवर माती फेकली. खलीवर उपचार चालू असून डॉक्टरांनी त्याला सक्तीच्या आरामाची गरज असल्याचे सांगितले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

आईला भेटण्यासाठी मुलगा थेट लंडनहून कार चालवत मुंबईत पोहोचला

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

Show comments