Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात दुष्काळ; आसामात महापुराचे थैमान

Webdunia
बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (11:13 IST)
महाराष्ट्रात दुष्काळाने थैमान घातले असले तरी देशात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. आसामात महापुराने पाच जणांचा बळी घेतला आहे.
 
आसाममध्ये महापूराचे गंभीर स्वरुप धारण केले असून लाखो लोक प्रभावीत झाले आहेत.  पूरग्रस्तांना अन्न, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतील याची दक्षता घेण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सोमवारी प्रशासनाला दिले आहेत.
 
दरम्यान, महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक गडद झाली आहे. राज्याच्या पूर्व भागात जनावरांसाठी चारा छावण्या आणि नागरिकांना पिण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दुष्काळी दौरा करुन मदत जाहीर केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

राज्यातील 4 विधानपरिषदेसाठी मतदान आज

डकवर्थ-लुईस नियमाचे सह-निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

Show comments