Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायबरेलीमध्ये रेल्वे अपघात, 15 ठार

Webdunia
शुक्रवार, 20 मार्च 2015 (13:19 IST)
डेहराडूनहून वाराणसीला जाणारी जनता एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि बर्‍याच संख्येत प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रायबरेली जिल्ह्याच्या बछरावां रेल्वे स्थानकाजवळ झाली.   
 
शुक्रवारी सकाळी जनता साधारण एक्सप्रेस बछरावा रेल्वे स्थानकाजवळ  इंजिनच्या मागील दोन डबे रुळांवरुन घसरले. या एक्सप्रेसला बछरावा स्टेशनवर थांबा होता पण गाडी तिथे थांबली नाही व स्टेशनपासून पुढे जाऊन या ट्रेनचे चार डबे रुळांवरुन घसरले. एक्सप्रेसचे ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता आहे.   
 
जखमींना लखनौ, रायबरेली व बछरावा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस व रेल्वेचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले असून रेल्वे मंत्रालयाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  
सर्व पहा

नक्की वाचा

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

Show comments