Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सेमी-हायस्पीड ट्रेन' दिल्लीहून आग्रा येथे रवाना

Webdunia
गुरूवार, 3 जुलै 2014 (15:40 IST)
'सेमी-हायस्पीड बुलेट ट्रेन' आज (गुरुवार) दिल्लीहून आग्र्याला रवाना झाली. ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावते. या ट्रेनच्या माध्यमातून दिल्ली ते आग्रा हे 195 किलोमिटरचे अंतर अवघ्या 90 मिनिटांत गाठता येणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून ही ट्रेन औपचारिकरित्या सुरू होणार आहे.

या मार्गावर आधी भोपाळ शताब्दी एक्स्प्रेसचा वेग सर्वाधिक होता. भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ताशी 150 किलोमीटर वेगाने धावते. या रेल्वेने दिल्ली ते आग्रा अंतर कापण्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी लागतो. आता या सेमी हायस्पीड बुलेट ट्रेनच्या माध्यमातून हे अंतर अवघ्या 90 मिनिटांत कापता येणार आहे.

दिल्ली रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरून ही सेमी हायस्पीड ट्रेन गुरुवारी सकाळी सव्वा अकराला रवाना झाली. या चाचणीवेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त पी.के.वाजपेयी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

Show comments