Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'भारतरत्न' पुरस्काराने सचिनचा गौरव

वेबदुनिया
WD
आपला सचिन तेंडुलकर 'भारतरत्न'ने सन्मानित!
नवी दिल्ली- मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरला आज (मंगळवार) 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सचिनसह ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा.सीएनआर राव यांनाही 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती भवनामध्ये एका दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते या दोन रत्नांना मानाचे पान आणि सनद देऊन गौरविण्यात आले. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारा सचिन हा पहिला क्रिकेटपटूच नव्हे तर पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर हा मान मिळालेला सचिन हा सगळ्यात तरूण व्यक्तीमत्व ठरले आहे. या कार्यक्रमाला सचिनची पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होती.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Show comments