Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कडप्पा शहरामध्ये 11 वर्षीय विद्यार्थ्याला विजेच्या तारेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू

Webdunia
गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (13:17 IST)
आंध्रप्रदेश मधील कडप्पा शहरामध्ये बुधवारी दुपारी एका 11 वर्षीय लहान मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सायकल विजेच्या मोकळ्या तारांमध्ये अडकली. या घटनेमध्ये सायकलवर मागे बसलेला 10 वर्षीय मुलगा गंभीर स्वरूपाने जखमी झालेला आहे. हे दोन्ही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी जात होते. तेव्हा खांबावर लटकत असलेल्या विजेच्या तारेच्या विळख्यात ते सापडले.
 
धावत येऊन नागरिकांनी तातडीने ते विजेचे तार बाजूला केले. या मध्ये अकरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दहा  वर्षीय मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी वीज महामंडळावर बेजवाबदार पणाचा आरोप लावला आहे. पोलिसांनी केस नोंदवून घेत चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक चौकशीमधून माहित पडले की, एक डिश टीवीचा तार विजेच्या तारेच्या संपर्कात आला होता. ज्यामुळे हा अपघात घडला आहे. कडप्पाचे आमदार माधवी रेड्डी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचे सांगितले की सरकार त्यांना सर्व मदत करेल असे आश्वासन दिले.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments