Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

88 वर्षीय एनडी तिवारींचे शुभमंगल!

Webdunia
गुरूवार, 15 मे 2014 (16:35 IST)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी यांनी आज (गुरूवार) उज्ज्वला शर्मा यांच्याशी विवाहबद्ध झाले. तिवारी आणि उज्ज्वला शर्मा गेली अनेक वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना रोहीत शेखर हा मुलगाही आहे.

एन.डी.तिवारी आपले जैविक वडील असल्याचा दावा रोहीत शेखरने केला होता. परंतु तिवारी यांनी त्याचा दावा सुरुवातीला फेटाळून लावला होता. मात्र रोहितने आपल्या हक्कासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. डीएनए चाचणीत तिवारी हेच रोहीतचे वडील असल्याचेही स्पष्ट झाले होते. तिवारींनी अखेर माघार घेऊन रोहीत शेखर हा आपलाच मुलगा असल्याचे जाहीर केले होते. नंतर तिवारी यांनी रोहीतसह त्याची आई उज्ज्वला शर्मा यांचाही स्वीकार केला होता.

या प्रकरणामुळे तिवारी सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. आता तर तिवारींनी वयाच्या 88 व्या वर्षी विवाह केला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, तिवारींना हे प्रकरण चांगलेच भोवले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसने डच्चू दिला आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments