Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोधपूरमध्ये रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, कोलकाता प्रकरणाची पुनरावृत्ती!

Webdunia
मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (14:57 IST)
राजस्थानच्या जोधपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जोधपूरच्या एका रुग्णालयाच्या आवारात एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार झाला असून या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडित मुलीवर सफाई कर्मचाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे.

पीडित मुलगी दोन दिवसांपूर्वी घरातून रागावून निघाली होती आणि रविवारी रात्री रुग्णालयाच्या परिसरात एकटी बसलेली असताना दोन तरुणांनी तिला उचलून नेले आणि रुग्णालयाच्या मागे असलेल्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी आणि भयावह आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अत्याचारात अल्पवयीन मुलीवर अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरु आहे. कोलकाता सारखी घटना या ठिकाणी घडली असून या घटनेने जोधपूर हादरले आहे. रुग्णालयांना सुरक्षित समजले जाते त्या ठिकाणी अशा घटना घडणे समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण  करणारे आहे.
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments