Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IIT मद्रासमध्ये PhD च्या विद्यार्थ्यानं व्हॉट्सअपवर ‘सॉरी’ मेसेज पाठवून केली आत्महत्या

Webdunia
रविवार, 2 एप्रिल 2023 (17:24 IST)
आयआयटी मद्रासमधील 31 वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केलीय. चेन्नईतील वेलाचेरीमधील भाड्याच्या घरात त्यानं कथितरित्या आत्महत्या केली. सचिन कुमार जैन असं विद्यार्थ्याचं नाव असून, सचिन मूळचा पश्चिम बंगालमधील होता.
 
सचिननं आत्महत्येपूर्वी मित्रांना व्हॉट्सअप मेसेज पाठवले होते. हे मेसेज चेन्नई शहर पोलिसांनी रिकव्हर केले आहेत. या मेसेजमध्ये सचिननं म्हटलंय की, ‘नीट काहीच करत नव्हतो’. तसंच, याचा आपल्याला ‘पश्चाताप’ असल्याचंही सचिननं म्हटलंय.
 
पोलिसांनी सांगितलं की, “देवकुश आणि देवराज अशा दोन मित्रांसोबत सचिन आयआयटीला निघाले होते. हे दोघेही पीएचडीचेच विद्यार्थी आहेत. सचिन लवकर घरी परतला. त्यानं व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि त्यानंतर आत्महत्या केली. सचिन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधून पीएचडी करत होता.”
 
सचिनच्या मित्रांनी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, डॉक्टर घटनास्थळी पोहोचेपर्यंत सचिनचा जीव गेला होता. डॉक्टरांनी घटनास्थळी येऊन तपासल्यानंतर सचिनला मृत घोषित केलं.
 
सचिनच्या आत्महत्येच्या एक महिन्याभरापूर्वी आयआयटी कॅम्पसमध्ये दोन इतर विद्यार्थ्यांनीही आत्महत्या केली होती.
 
काही माजी आणि आताच्या विद्यार्थ्यांनी बीबीसी तमिळला ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, आयआयटी मद्रासचं कॅम्पस दिवसेंदिवस ‘विषारी’ होत चाललंय.
मात्र, आयआयटी मद्रासने मार्च महिन्यात पत्रक जारी करत म्हटलं होतं की, कोरोनानंतरचा काळ अत्यंत आव्हानात्मक आहे आणि आयआयटी मद्रास प्रशासन इथलं वातावरण विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
चेन्नई पोलिसांनी सांगितलं की, सचिनच्या कुटुंबाला त्याच्या आत्महत्येबाबत माहिती देण्यात आळी असून, सचिनचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आलाय.

Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments