Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 20 April 2025
webdunia

आपच्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द

aap party
, शनिवार, 20 जानेवारी 2018 (10:05 IST)

निवडणूक आयोगाने आपच्या २० आमदारांचे सदस्यत्व लाभाच्या पद प्रकरणी रद्द केले. दिल्ली सरकारमध्ये असलेल्या २० आमदारांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले आहे..  या निर्णयावर आता राष्ट्रपती अंतिम निर्णय घेतील. याबाबतचा अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आयोगामार्फत पाठवला जाईल. 

आपच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोतर्ब केल्यास दिल्लीमध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. २० आमदारांच्या अपात्र ठरवल्याने निवडणुका झाल्या तरी दिल्ली सरकारचे फक्त संख्याबळ कमी होणार आहे. त्यांचे सरकार कायम राहणार आहे.

आयोगाच्या बैठकित हा निर्णय झाला. राष्ट्रपतींच्या आदेशावरुनच लाभाच्या पद प्रकरणाची चौकशी सुरू होती. या निर्णयाविरोधात आप न्यायालयात जाऊ शकणार आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बजेट' म्हणजे काय, हा शब्द कुठून आला?