Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबू आझमींच्या भाच्यावर ड्रग्ज तस्करीचा आरोप

Webdunia
गुरूवार, 8 जून 2017 (11:47 IST)

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याच्या आरोपावरुन कासिमला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तो  समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या भाचा आहे.  त्याला  मुंबईच्या वाकोल्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधून अटक झाली. दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त संजीव यादव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या छापेमारीत अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला होता. त्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघांना अटक करत त्यांची चौकशी सुरु केली, तेव्हा हे ड्रग्ज कासिमनेच पुरवल्याचा दावा त्यांनी केला. कासिम हा ड्रग्ज प्रकरणातील देशातील मोठा तस्कर असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments