Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जयपूर येथे ट्रक आणि कारचा अपघात, 5 जण ठार

Webdunia
मंगळवार, 6 जून 2017 (13:24 IST)
मिठाने भरलेला ट्रक कारवर आदळल्याने अपघात झाल्याची घटना पहाटे घडली. यात 5 जण जागीच ठार झाले असून ट्रक चालक फरार आहे.
 
जयपूरच्या चोमू हाऊस सर्कल भागात पहाटे 4 सुमारास ही दुर्घटना घडली. नवा मकरानाहून मिठाने भरलेला हा ट्रक आग्र्याच्या दिशेने जाताना एका कारवर आदळला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे सगळे मालवीय नगर येथील रहिवासी आहेत. ट्रकजवळ 45 टन मिठाची पावती होती. दुर्घटनाग्रस्त कारमधील तरुण व तरुणीचे येत्या 10 दिवसांत लग्न होणार होते.
 
मिठाने भरलेला ट्रक जात असताना अचानक समोरून एक कार आली. त्यामुळे ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो थेट कारवर जाऊन आदळला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितेल. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पाहणी करत आहेत. ट्रकखाली दबलेल्या कारला आता बाहेर काढण्यात आले आहे. रस्त्यावर सर्वत्र मीठच मीठ पसरले असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments