Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नक्षलवाद्यांकडून अक्षयकुमार आणि सायनाला धमकी

Webdunia
सोमवार, 29 मे 2017 (11:21 IST)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. यानंतर अक्षय कुमार आणि सायना नेहवालने शहीद जवानांचा कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्या मदतीलाच आक्षेप घेत नक्षवाद्यांनी चक्क एक पत्रक काढून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यापुढे नक्षली हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करु नका, असा इशाराही नक्षलवाद्यांनी दिला आहे. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांनी केलेल्या आर्थिक मदतीचा आम्ही निषेध करतो, असं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी म्हणजेच पीएलजीएने पत्रकात म्हटलं आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments