Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय कुमारचे राजनाथ सिंह यांनी मानले आभार

Webdunia
शुक्रवार, 17 मार्च 2017 (13:10 IST)

अक्षय कुमारने सुकमा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे आभार मानले आहेत. सुकूमा येथे 11 मार्च रोजी माओवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला अक्षय कुमारने 9 लाखांची मदत दिली आहे.  अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घटनेनंतर लगेचच अक्षय कुमारने गृहमंत्रालयाशी संपर्क साधला होता. आर्थिक मदत करता यावी यासाठी अक्षयने शहिदांच्या कुटुंबियांचं बँक खातं क्रमांक पुरवण्याची विनंती केली होती. मंत्रालयाने त्यांची विनंती स्विकार करत सीआरपीएफमधील शहीद जवानांच्या कुटुंबियांची बँक खाती क्रमांक पुरवण्याचे आदेश दिले होते. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments