युवा रंगकर्मी आणि दिग्दर्शक आलोक राजवाडे याचे नाव प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीमध्ये झळकले आहे. ‘फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत फॅशन, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, चित्रपट, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवांपैकी आश्वासक ३० युवक-युवतींना या विशेष यादीमध्ये स्थान दिले असून त्यामध्ये पुण्याच्या आलोकचा समावेश आहे.सन्मान माझ्या एकटय़ाचा नाही तर, ‘समन्वय’, ‘आसक्त’ आणि ‘नाटक कंपनी’ या संस्थांच्या माध्यमातून मी ज्या कलाकारांसमवेत काम केले त्या सर्वाचा या यशामध्ये तेवढाच महत्त्वाचा आणि मोलाचा सहभाग आहे, असेही आलोक याने कृतज्ञतापूर्वक सांगितले.