Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरनाथ यात्रा बस हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2017 (11:29 IST)
म्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा ही संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. उत्तर प्रदेशात कावड यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तर गृह मंत्रालयाचे एक पथक श्रीनगरला रवाना झाले आहे.


अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जण ठार झाले. बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले घडवले. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक हे महाराष्ट्रातील पालघरचे आहेत. जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments