Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार

Amit Shah
Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (14:49 IST)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. गुजरातमधून ते निवडणूक लढवतील. तसंच त्यांच्यासोबत स्मृती इराणी याही निवडणूक लढवणार आहे.  भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढवतील असा निर्णय झाला अशी माहिती केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी दिली.

अमित शहा गुजरातमधून विद्यमान आमदार आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी आता अमित शहा आमदारकीचा राजीनामा देतील.  शहा यांच्यासोबत स्मृती इराणी याही राज्यसभेची निवडणूक लढवतील. तसंच मध्यप्रदेशमधील एकमात्र राज्यसभेच्या जागेसाठी संपतिया उइके यांना उमेदवारी देण्यात आलीये. उइके हे आदिवासी नेते आहे. मध्यप्रदेशमधील पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी या जागेसाठी पोटनिवडणूक होतेय.

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments