Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपसाठी कर्नाटक दक्षिणेतील प्रवेशद्वार : अमित शहा

Amit Shah
Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (11:35 IST)
कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही फक्त या राज्यापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी ती खूप महत्त्वाची आहे. या निवडणुकीतूनच भाजपला दक्षिणेत प्रवेश करण्यासाठी दरवाजे खुले होतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकातील एका सभेत व्यक्त केला. मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण केल्यास यश मिळते, हा मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा मनसुबा यावेळी यशस्वी होणार नाही. भाजप हा इतरांपेक्षा वेगळ्या संस्कृतीचा पक्ष आहे. इतर पक्ष हे निवडणुका डोळ्यासोर ठेवून काम करतात. भाजपकडे जगातील सुप्रसिद्ध नेते आहेत. त्याचबरोबर 11 कोटींहून अधिक सभासद असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
 
कर्नाटक हे भाजपसाठी खूप महत्त्वाचे राज्य आहे. आम्हाला दक्षिणेत जाण्यासाठी इथूनच मार्ग खुला होणार आहे, असे म्हणत शहा यांनी काँग्रेस व मुख्यमंत्री सिद्धराय्या यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आमदारपुत्राचा उल्लेख केला. काँग्रेसचे आमदार हरीस यांच्या पुत्राने एकाला मारहाण केली, पण अजूनही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल नाही, असे का, असा सवाल उपस्थित करत तो हरीस यांचा मुलगा आहे. त्याच्या माध्यमातून मुस्लीम समजाचे तुष्टीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.
 
भाजपची संस्कृती इतर पक्षांपेक्षा भिन्न आहे. इतर पक्ष आणि त्यांचे मंत्री हे फक्त निवडणुका डोळ्यासोर ठेवून काम करतात. दुसर्‍या बाजूला आमच्याकडे जगप्रसिद्ध नेते आणि काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेले आमचे 11 कोटी सदस्य असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
 
दरम्यान, कर्नाटकातील भ्रष्ट सरकार हटवा, असा संदेश मोदी यांनी गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये झालेल्या सभेत दिला. त्यावर, गैरव्यवहारांच्या आरोपांवरून तुरुंगाची हवा खाऊन आलेले येडीयुराप्पा भाजपला कसे चालतात, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला आहे. भाजपची सारी मदार लिंगायत समाजावर असतानाच काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म किंवा पंथाचे आश्वासन देत चुचकारले आहे. भाजपचा मात्र स्वतंत्र धर्मचा दर्जा देण्यास विरोध आहे. लिंगायत समाजाला पुढे करीत काँग्रेस जातीपातींचे राजकारण करीत असल्याचा आरोप येडीयुराप्पा यांनी केला आहे. येडीयुराप्पा हे लिंगायत समाजाचे असून, पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उेमदवार म्हणून जाहीर केल्याने हा समाज आपल्या पाठीशी उभा राहील, असा भाजपला विश्वास आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

पुढील लेख
Show comments