Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमुल बटरची 'ही' जाहिरात सोशल मीडियात प्रचंड व्हायरल

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2020 (08:24 IST)
सध्याच्या भारत आणि चीन तणावावर भाष्य करण्यासाठी अमुलच्या क्रिएटिव्ह टीमनं भन्नाट जाहिरात केली आहे. सुप्रसिद्ध ब्रँड अमुल बटरची ही जाहिरात सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत, यामध्ये अमुल गर्ल फ्रिजमधून बटर दाखवत STik With This Stok असं सांगत आहे. त्यासोबतच Amul We Chat over tea असाही उल्लेख करण्यात आला आहे. भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अमुलच्या या जाहिरातीतून प्रसिद्ध चिनी अ‍ॅप Tiktok आणि WeChat यांचा उल्लेख करत भारतीय उत्पादनांना प्राधान्य द्या असा संदेश दिला आहे.
 
याआधीही अमुलच्या ट्विटर हँडलने Exit The Dragon? असं वाक्य वापरुन एक जाहिरात केली होती. या जाहिरातीला सोशल मीडियात प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ट्विटरने अचानक अमुलचं अधिकृत ट्विटर हँडल ब्लॉक केले होते. कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय ट्विटर हँडल ब्लॉक केल्याने अमुल व्यवस्थापनही चकीत झाले होते. त्यानंतर ट्विटरने आमची भूमिका समजून घ्यायला हवी होती असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पुन्हा एकदा अमुलच्या या ताज्या जाहिरातीची नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.  

संबंधित माहिती

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

पुढील लेख
Show comments