rashifal-2026

केजरीवाल यांच्या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:44 IST)

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या स्वच्छ राजकारणासाठी मदत करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासांत पक्षाकडे २४ लाख रुपये देणगी रुपाने जमा झाले आहेत. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी धनत्रयोदशीला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. पहिल्याच दिवशी १ हजार ८३० लोकांनी याला प्रतिसाद देत १४ लाख ७२ हजार देणगी दिली. यात सर्वांत कमी १० रुपयांची तर सर्वाधिक एक लाख रुपयांची देणगी होती. तर, बुधवारी सायंकाळी सव्वा सहापर्यंत १ हजार २० लोकांनी आणखी १० लाख रुपये दिले. तर   १ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान पक्षाला ८३५ लोकांनी १३ लाख २३ हजार रुपयांची देणगी दिल्याचे  पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

‘आप हा असा पक्ष आहे जो सतत संघर्ष करत आहे. पक्षाच्या अर्थिक व्यवहारांसंबंधी वेळोवेळी माहिती दिली जाते. पक्षाचे ४ खासदार, ८६ आमदार आणि ५२ नगरसेवक आहेत तरीही पक्ष चालवण्यासाठी पैसे नाहीत.’ असा आवाहन अरविंद केजरीवाल यांनी ई-मेलद्वारे केले होते. केजरीवाल यांच्या या आवाहनानंतर ट्विटरवर #CleanPoliticsThisDiwali हा ट्रेंडही सुरू झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments