Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियकराने सोडून दिलं म्हणून रागात प्रेयसीने दगड आणि रॉडने तुडवून घेतला प्राण

Webdunia
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (15:29 IST)
दिल्लीजवळ गुरुग्राममधल्या एका रिक्षाचालकाच्या खून प्रकरणात वेगळीच खळबळजनक माहिती समोर आली आहे. या रिक्षाचालकाच्या प्रेयसीनेच त्याचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याचं उघडकीस आलं आहे. 
 
नेमकं काय घडलं?
मृत आसिफ मूळात उत्तर प्रदेशातल्या बदायूंचा रहिवासी होता आणि गुरुग्राममध्ये तो ऑटो चालवत होता. पोलिसांना रिक्षाचालकाला बेदम मारहाण करत असल्याची खबर मिळल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण तो गंभीर अवस्थेत सापडला आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
 
आता या नवीन वळण म्हणजे गुरुग्राम पोलिसांनी या खळबळजनक खून प्रकरणात मृतक तरुणाच्या प्रेयसी सोनिया आणि तिचा मानलेला भाऊ याकूबला अटक केली आहे.
 
गेल्या 3 वर्षांपासून रिक्षाचालक आसिफ आणि सोनिया यांच्या रिलेशनशिपमध्ये वाद सुरू होते. प्रियकर आसिफने त्याच्या पालकांच्या संमतीने लग्न करण्यचा निर्णय घेतला होता आणि यासाठी त्याने सोनियाला सोडण्याचे ठरवले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तिने रागाच्या भरात आपल्या प्रियकराचा खून केला.
 
गुरूग्राम पोलिसांनी या खून प्रकरणात वापरण्यात आलेल्या काठ्या आणि लोखंडी रॉड जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मारेकरी उत्तर प्रदेशाचे रहिवासी आहेत आणि गुरुग्राममध्ये राहून नोकरी करत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

पुढील लेख
Show comments