Marathi Biodata Maker

आरएसएसच्या कार्यक्रमावर चाकू आणि काठ्यांनी हल्ला, 7-8 जण जखमी

Webdunia
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (12:37 IST)
राजस्थानमध्ये गुरुवारी रात्री जयपूरच्या करणी विहार भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरएसएस कार्यक्रमादरम्यान चाकू आणि काठ्यांनी हल्ला झाला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. शरद पौर्णिमेनिमित्त खीर वाटप सुरू असताना काही अज्ञातांनी संघ कार्यकर्त्यांवर हल्ला केला. तसेच या हल्ल्यात 7-8 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सांगितले की, त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
मिळालेल्या माहितीनुसार भजन-कीर्तन झाल्यानंतर खीर वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना 20-25 जण तेथे आले आणि त्यांनी आधी खीरच्या भांड्याला लाथ मारली आणि नंतर शिवीगाळ सुरू केली. उपस्थित लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी 7-8 जणांवर चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांना घटनास्थळीच पकडण्यात आले असून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. व परिस्थिती नियंत्रणात आहे.
 
भाजपचे माजी अध्यक्ष अरुण चतुर्वेदी म्हणाले की, करणी विहार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रजनी विहारमध्ये संघाच्या कार्यक्रमादरम्यान काही समाजकंटकांनी संघ कार्यकर्त्यांवर हल्ला केला. तसेच करणी विहार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस या हल्ल्यामागील कारणाचा शोध घेत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments