Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरवर पक्ष्याची धडक , वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग

Webdunia
रविवार, 26 जून 2022 (11:43 IST)
Yogi Adityanath Helicopter : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.  सीएम योगींच्या हेलिकॉप्टरवर अचानक पक्षी आदळला, त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असे सांगण्यात आले आहे. मात्र या पक्ष्याच्या धडकेनंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सुदैवाने या अपघातात  कोणालाही दुखापत झाली नाही.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित आहेत. 
 
पक्षी आदळल्यानंतर हेलिकॉप्टरची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सावधगिरीने उतरल्यानंतर हा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर सीएम योगींना पर्याय म्हणून दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनौला जात होते, मात्र उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच पक्षी हेलिकॉप्टरला धडकले, त्यानंतर त्यांना उतरावे लागले. 
 
जेव्हाही अशी घटना घडते तेव्हा हेलिकॉप्टर प्रोटोकॉल अंतर्गत उतरवले जाते. त्यानंतर तांत्रिक पथक त्याची कसून तपासणी करते आणि जोपर्यंत सर्व काही ठीक आहे याची खात्री होत नाही तोपर्यंत व्हीआयपी हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी दिली जात नाही. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments