Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिस्मिल्ला खान यांच्या सनया चोरीचे प्रकरण : नातवालासह दोन सोनारांना अटक

Webdunia
बुधवार, 11 जानेवारी 2017 (14:46 IST)
भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी  नातवाला आणि त्याच्याकडून या सनया विकत घेणाऱ्या दोन सोनारांना अटक केली आहे. याबाबत विशेष तपास पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, बिस्मिल्ला खान यांचा नातू नझरे हसन उर्फ शदाब आणि शंकरलाल शेठ व त्यांचा मुलगा सुजित शेठ या दोन सोनारांना अटक केली आहे. नझरे हसन याने चार चांदीच्या सनया चोरल्याची कबुली दिली. या सनया वितळवून तयार केलेला एक किलो चांदीचा गोळाही हस्तगत करण्यात आला. या बदल्यात सोनाराने नझरे हसन यास १७ हजार रुपये दिले होते. 
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments