Dharma Sangrah

भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार

Webdunia
बुधवार, 16 मे 2018 (09:13 IST)
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 जाहीर झाला असून कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं.
 
तांत्रिक घोळामुळे एका जागेचा निकाल रद्द करण्यात आला. यात भाजपच्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या विजयी उमेदवाराचा निकाल रद्दबातल करण्यात आला होता. मतमोजणीनुसार जगदीश शेट्टार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगानं हा निकाल रद्द करत राखून ठेवला होता. अखेरी मध्यरात्री जगदीश शेट्टार यांनाच विजयी घोषित करण्यात आलं.  आता कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.


कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

  • भाजप 104

  • काँग्रेस 78

  • जनता दल (सेक्युलर) 38

  • बहुजन समाज पार्टी 1

  • कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments