Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार

Webdunia
गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (13:06 IST)
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे (Sajad Ahmad Khanday) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. भाजप नेते सज्जाद अहमद खांडे यांच्या कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथील घराबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होता, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
 
आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने (terrorist attack)या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. सुरुवातीच्या मृत सरपंच इतर अनेक सरपंचांसह प्रवासी छावणीत राहत होते. मात्र, त्यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते वेसूला निघून गेले. जेव्हा आपल्या घराच्या केवळ 20 मीटर अंतरावर होता तेव्हा त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.
 
याआधी जुलैमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागात भाजप नेते वसीम अहमद बारी आणि त्याचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते. बांदीपुरा येथे पोलीस स्टेशनजवळील एका दुकानाबाहेर तिघांवर हल्ला झाला होता. यापूर्वी 8 जून 2020 रोजी दक्षिण काश्मीर अनंतनाग जिल्ह्याचे सरपंच अजय पंडिता यांना दहशतवाद्यांनी ठार (terrorist attack)केले होते.
 
दरम्यान, याआधी 5 ऑगस्ट रोजी 370 कलम हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. दहशतवादी संघटना घातपात करतील, याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला होता.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments