Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

५ वर्षाखालील बालकांसाठी 'बालआधारकार्ड'

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:35 IST)
आता ५ वर्षांखालील मुलांकडे आधारकार्ड असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बालआधारकार्ड देण्यात येणार आहे.  यूआयडीएआयने (UIDAI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. त्यानुसार ५ वर्षाखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल असे सांगण्यात आले आहे. पण हे मूल जेव्हा वयाची वर्षे पूर्ण करेल तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रीक चाचणी करण अनिवार्य आहे असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्याला घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात घेऊन जाऊ शकतात. यूआयडीएआयने आणखी एका ट्विटव्दारे बालआधारकार्डसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालू शकेल असे म्हटले आहे. यामध्ये मान्यताप्राप्त शालेय संस्थेचे बालकाचा फोटो असलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
 
या ट्विटसबरोबरच यूआयडीएआय या नव्या निळ्या रंगाच्या आधारकार्डचे इन्फोग्राफिक्स ट्विटरवर टाकले आहेत. ५ वर्षाच्या आतील मुलांना आधारकार्ड असणे सक्तीचे नसले तरीही परदेशातील शालेय उपक्रमांसाठी, शासकीय शिष्यवृत्तीसाठी त्याची आवश्यकता असते. मूल ५ वर्षाचे झाल्यावर मात्र हे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच हाताची बोटे, डोळे, चेहरा यांची बायोमेट्रीक चाचणी होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments