Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे स्टार्सदेखील चढून चुकले आहे कोर्टाची पायरी

Webdunia
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला दोषी करार देत दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमान मुंबईत फुटपाथवर झोपत असलेल्या लोकांवर कार चढवण्याच्या प्रकरणालाही समोरा जाऊन चुकले आहे. तसेच सलमान एकमेव असे कलाकार नाही ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल. असे अजूनही स्टार्स आहेत. जाणून घ्या त्या कलाकारांबद्दल:
 
संजय दत्त
संजय दत्त बेकायदेशीर हत्यार ठेवण्यात दोषी आढळले होते आणि न्यायालयाने त्याला 5 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात संजय पुण्याच्या यरवदा जेलमध्ये शिक्षा भोगून चुकले आहे.
 
मोनिका बेदी
अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम यांच्या प्रेयसी मोनिका बेदी बोगस पासपोर्ट प्रकरणात पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मोनिकाला पोर्तुगालमध्ये बोगस पासपोर्टसह पकडली गेली होती. या प्रकरणात 2006 मध्ये कोर्टाने तिला पाच वर्षाची शिक्षा ठोठावली होती. मोनिकाला मध्यप्रदेशातील भोपाळ येथील कारागृहात ठेवले गेले होते.
 
सूरज पंचोली
आदित्य पंचोलीला मुलगा सूरज पंचोली यावर आपल्या प्रेयसीला जिया खानला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करण्याचा आरोप आहे. सूरजविरुद्ध धारा 306 अंतर्गत प्रकरण नोंदवले आहेत. सूरज 10 जून 2013 मध्ये या प्रकरणामुळे जेलमध्ये जाऊन चुकला आहे. नंतर त्याला जामीन मिळाली. जिया खानने 3 जून 2013 रोजी आपल्या घरात फाशी लावली होती. ती दोन दिवसापासून सूरजच्या घरी होती आणि सकाळी आपल्या घरी परतली होती.
 
सैफ अली खान
छोटे नवाब म्हणून प्रसिद्ध सैफ अली खान हादेखील काळवीट शिकार प्रकरणात गुन्हेगार आहे. तसेच जोधपुरच्या सीजेएम कोर्टाने त्याला बरी केले आहे. त्यावर एका एनआरआय बिझनेस मॅनला मारहाण करण्याचेही प्रकरण नोंदवलेले आहे.
 
शाहरुख खान
वर्ष 2012 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान शाहरुखच्या क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्‍यांशी वाद घडला होता. आरोपाप्रमाणे त्याने सिक्योरिटी गार्डला शिव्या घातल्या होत्या. यानंतर त्यावर पाच वर्षापर्यंत वानखेडे स्टेडियममध्ये येण्यावर बॅन घालण्यात आले होते. शाहरुखवर ओम शांति ओम या सिनेमात वयस्कर मनोज कुमार यांची प्रतिमा धूमिळ करण्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती.
 
फरदीन खान
वर्ष 2001 मध्ये फरदीन खान कोकेन खरेदी करताना पकडला गेला होता. या प्रकरणात त्याविरुद्ध एनडीपीएसची धारा 27 अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आले होते.
 
गोविंदा
2007 साली मनी है तो हनी है या सिनेमाच्या सेटवर गोविंदाने एका व्यक्तीला चापट मारली होती. या प्रकरणात त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्याला क्षमा मागावी लागली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments