Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लंडनहून दिल्लीला येणाऱ्या Vistara विमानात बॉम्बची धमकी

Webdunia
गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (09:31 IST)
बुधवारी लंडनहून दिल्लीला येत असलेल्या Vistara विमानात बॉम्बची धमकी मिळाली, जी नंतर फसवी ठरली. तसेच विमान दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. मिळालेल्या माहितीनुसार विमानाच्या टॉयलेटमध्ये बॉम्बचा संदेश असलेला कागद सापडला होता, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की विमानाची कसून तपासणी करण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार "कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत, पोलिसांनी सांगितले की, “आम्हाला सांगण्यात आले की विमानाच्या टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यावर लिहिले होते की विमान बॉम्बने उडवले पाहिजे. पोलिसांनी सांगितले की, सर्व प्रवासी कोणतीहीव्यवस्थित विमानातून उतरले.
 
तसेच विमानात सुमारे 290 प्रवासी होते. दिल्ली स्थितAOCCला सकाळी 9.45 वाजता बॉम्बच्या धोक्याची माहिती देण्यात आली आणि नंतर 12.45 वाजता विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार लंडनहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाइट क्रमांक UK 018 च्या क्रूला विमानात बॉम्बची धमकी असलेली नोट सापडली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments