Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीत एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

Webdunia
बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (10:34 IST)
दिल्लीतील पालम भागात एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपी केशव (25) याला अटक केली आहे. केशवने आपल्या आई-वडील, आजी आणि बहिणीची हत्या केली आहे. या तरुणाला अंमली पदार्थांचे व्यसन असून त्यासाठी तो नातेवाइकांकडे पैशांची मागणी करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नकार दिल्याने तरुणाने त्यांची  निर्घृण हत्या केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस जेव्हा घरात गेले तेव्हा तिथे फक्त रक्तच सांडले होते. तरुणाने बहिणीची खोलीत हत्या केली, तिचा मृतदेह जमिनीवर पडला होता. खोलीतील बेडवर आजीचा मृतदेह आढळून आला. बाथरूममध्ये आई-वडिलांचे मृतदेह दिसत आहेत. घरात बेडरूमपासून बाथरूमपर्यंत रक्त पसरले आहे. आरोपी केशव (25) याने आजी दिवाणो देवी (75), वडील दिनेश (50), आई दर्शना आणि बहीण उर्वशी (18) यांची हत्या केली.
 
आरोपी दारूच्या नशेत होता आणि घरच्यांकडे पैसे मागत असे. कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचला. कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या मजल्यावर राहतात, त्यामुळे वेगवेगळ्या मजल्यावर जाऊन त्याने सर्वांची हत्या केली आहे.
 
माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास वरच्या मजल्यावर ओरडण्याचा आवाज येत असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता आणि चारही जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पालम पोलिसांनी केशवला अटक केली आहे.  
 
आरोपी केशव हा बराचकाळापासून नशेचा आहारी गेला होता. तो गांजा ओढायचा. तो रोज घरच्यांकडे पैसे मागायचा. रात्रीही त्याने आधी आजीकडे पैसे मागितले. आजीने पैसे न दिल्याने त्याने आजीची दुसऱ्या मजल्यावर कोयत्याने वार करून हत्या केली. यानंतर त्याने आईला विचारले. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने तिने आईची हत्या केली. यानंतर त्याने वडिलांची आणि नंतर धाकटी बहीण उर्वशीची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी फरार होता. आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे काका आले आणि त्यांनी पळून जाणाऱ्या आरोपी केशवला पकडले.

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments