Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीतील इमारतीला आग, तीन जण होरपळले, सात जणांना वाचवण्यात यश

Webdunia
रविवार, 26 मे 2024 (14:06 IST)
शहादरा जिल्ह्यातील कृष्णा नगर भागात पहाटे  2.35 वाजता एका इमारतीला आग लागली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण भाजले, तर सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इंडियन बँकेजवळील गली क्रमांक 1 मधील छछी बिल्डिंगमध्ये आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 11 दुचाकीही जळून खाक झाल्या आहेत. संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले, त्यामुळे दोन महिलांसह तीन जणांचा मृत्यू झाला आणि बाकीचे गुदमरले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चार मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 11 बाईकमध्ये आग लागली, जी पहिल्या मजल्यापर्यंत पसरली. त्यानंतर वरच्या मजल्यापर्यंत धूर पसरला. पहिल्या मजल्यावर जळालेले मृतदेह सापडले आणि वरच्या मजल्यावरून 12 जणांची सुटका करण्यात आली, ज्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 
 
परमिला शाद (66), केशव शर्मा (18) आणि अंजू शर्मा (34) अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय देवेंद्र (41), रुचिका (38) आणि सोनम शाद (38) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दिव्यांश (6), गौरव (41), करण राज (56), राहुल भल्ला (35), रोहित भल्ला (30), मनीष भल्ला (25), सीमा (54) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

पुढील लेख
Show comments