Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'बुलेट ट्रेन सोडा आधी पायाभूत सुविधा ठीक करा'

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (15:05 IST)
उत्तर प्रदेशामध्ये कानपुरजवळ रविवारी इंदूर-पाटणा एक्सप्रेसचे 14 डब्बे रुळावरून उतरले. त्यात मरणार्‍यांची संख्या 142 झाली आहे आणि 180 लोक जखमी झाले आहे.  
 
ट्रेनचे  रुळावरून उतरण्याचे कारण आणि याच्याशी निगडित दुसरे तांत्रिकी पक्षांबद्दल बोलताना रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य आदित्य प्रकाश मिश्रा यांचे मत -
"भारतात रुळावरून उतरण्यामुळे झालेल्या अपघातांचे कुठले ही इतिहास नाही आहे. ट्रेनचे रुळावरून उतरण्याचे चार मुख्य कारण असू शकतात.  
 
पहिला - समोर कोणी अवरोध आल्यामुळे ट्रेन रुळावरून उतरू शकते. बर्‍याच वेळा असे ही होते की एखादा जनावर अचानक रुळासमोर येऊन जातो ज्यामुळे ट्रेन रुळावरून उतरते.  
 
दुसरं- इंजिनाचा एखादा भाग जर पडला आणि त्याच्यावर ट्रेन चढली तरी अशा स्थितीत देखील ट्रेन रुळावरून उतरू शकते.  
 
तिसरा - जर रूळ तुटले असतील तरी ट्रेन रुळावरून उतरू शकते. पण अशा स्थितीत इंजिनासोबत ट्रेन उतरते. कानपुरजवळ जो अपघात झाला त्यात इंजिन रुळावरून नाही उतरला आहे.  
 
कधी कधी असे देखील होऊ शकते की इंजिनच्या निघाल्यानंतर रुळामध्ये गॅप वाढतो आणि तेव्हा मागचे डबे रुळावरून उतरून जातात.  
 
चवथा - बर्‍याच वेळा एखाद्या भागात उपद्रवी आणि गैर सामाजिक तत्त्वांचे तोड फोड केल्याने देखील ट्रेन रुळावरून उतरून जाते.  
 
जोपर्यंत बुलेट ट्रेन चालवण्याची बाब आहे तर त्याचे ट्रक बसवण्याचा खर्च फार महागात पडत. पाचशे किलोमीटर ट्रक बसवण्याचा खर्च   किमान एक लाख कोटी एवढं येत.  
 
सध्यातर भारतात ज्या लाइनी आहे, त्यांच्या सुरक्षेवर पूर्ण खर्चा करू शकत नाही आहे. अशा परिस्थितीत एकतर कोणी देशाने येऊन ट्रक बसावयाला पाहिजे किंवा आर्थिक रूपेण मदत मिळाली तरच हे शक्य आहे.   
 
भारतीय रेल्वेसाठी तर एवढा खर्च उचलणे शक्य नाही आहे. माझे असे मत आहे की जो पायाभूत सुविधा सध्या आमच्या जवळ आहे, आधी त्यावर लक्ष दिले पाहिजे.
 
कानपुरजवळ जो अपघात झाला आहे त्यात मानवीय चूक असल्याची शक्यता फारच कमी आहे. जे चार तांत्रिक कारणे सांगण्यात आले आहे त्यांची शक्यता जास्त वाटत आहे."

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments