Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या  मित्राने केली आत्महत्या
Webdunia
शुक्रवार, 17 मे 2024 (14:11 IST)
उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये उद्योगपती दावर बेग यांची हत्या झाली आहे. ते 7 मे पासून बेपत्ता होते.16 मे ला त्याचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला. शरीराचा एक तुकडा मिर्जापूर हायवेवर तर दुसरा तुकडा गंगा नदीच्या किनाऱ्यावर सापडला. डोके अजून पर्यंत मिळालेले नाही. पोलिसांना संशय आहे की नदीमध्ये फेकून दिले असले. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाची ओळख 55 वर्षीय दावर बेग अशी पटली आहे. तर आत्महत्या करणारा त्यांचा मित्र सिमेंट व्यापारी होता. मृतकाच्या कुटुंबाने माहिती दिली की ते चांगले मित्र होते. 
 
दावर त्यांच्या मित्राला भेटायला गेले होते व संध्याकाळी घरी परत येतो म्हणून सांगितले तर ते आलेच नाही त्यांचा फोन लावण्यात आला पण त्यांनी उचलला नाही. कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. तसेच पोलिसांना एका सीसीटीव्ही मध्ये दिसले की ते एका गाडीवरून गेलेत. 9 मे ला दावरच्या मित्राने आत्महत्या केली अशी बातमी समोर आली. या घटनेने त्यांच्या केस ला अजून गंभीर केले. मग गुरुवारी पोलिसांना दावर यांचा तुकड्यांमध्ये मृतदेह आढळला. दावर यांची हत्या का झाली? त्यांच्या मित्राने आत्महत्या का केली? याची चौकशी पोलीस करीत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments