उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीत वातावरण बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून सणाच्या काळात राज्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू ठेवण्यावरही त्यांनी भर दिला आणि सांगितले की, ग्रामीण असो की शहरी, प्रत्येक क्षेत्रात डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे.
तसेच योगी आदित्यनाथ यांनी सणाच्या काळात शांतता राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले असून 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात वीज खंडित होऊ नये, कारण या काळात अनेक हिंदू सण साजरे केले जातील, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश जारी करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू ठेवण्यावर भर दिला असून सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे, मग ते ग्रामीण असो किंवा शहरी. तसेच सण-उत्सवात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.