Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री योगींनी लखनौमध्ये आपत्कालीन बैठक बोलावली, प्रयागराजला येणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या

मुख्यमंत्री योगींनी लखनौमध्ये आपत्कालीन बैठक बोलावली  प्रयागराजला येणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या
Webdunia
बुधवार, 29 जानेवारी 2025 (09:31 IST)
Maha Kumbh stampede news : महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवासस्थानी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी प्रयागराजसह बनारस आणि अयोध्येत गर्दी नियंत्रणावरही चर्चा करत आहे.
ALSO READ: महाकुंभातील चेंगराचेंगरीत शेकडो लोक बेपत्ता<> मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने यात्रेकरू आले असताना महाकुंभमेळ्यादरम्यान संगम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आहे तर काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. प्रयागराजला येणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहे, पुढील आदेश येईपर्यंत सर्व विशेष गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहे. तसेच प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन ते प्रयागराजकडे जाणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या विशेष गाड्यांचे परिचालन सध्या थांबवण्यात आले आहे. त्याच वेळी, वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या इतर कुंभमेळ्याच्या विशेष गाड्यांचे परिचालन नेहमीप्रमाणे सुरू आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून प्रयागराजला येणाऱ्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्याच थांबवण्यात आल्या आहे.  

मुख्यमंत्री योगी यांचे आवाहन-
'तुम्ही ज्या घाटाच्या जवळ आहात तिथे आंघोळ करा;' 'संगम नाकावर जाण्याचा प्रयत्न करू नका',  'मेळा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, अफवांकडे लक्ष देऊ नका', मुख्यमंत्री योगी यांनी भाविकांना आवाहन केले आहे.  महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांची वाढती गर्दी पाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रमुख संतांसह लोकांना विशेष आवाहन केले आहे. योगी म्हणाले की, भाविकांनी गंगा मातेच्या कोणत्याही घाटावर स्नान करावे आणि संगम नाक्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. असे योगी म्हणाले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments