Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नूडल्स खाऊन मुलाचा मृत्यू, सहा जणांची प्रकृती गंभीर

Webdunia
रविवार, 12 मे 2024 (13:35 IST)
उत्तर प्रदेशच्या पिलिभीत मधील राहुल नगर गावात दोन कुटुंबातील सहा जणांनी नूडल्स आणि भात खाल्ल्याने  त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. उपचारानंतर ते घरी आल्यावर एका मुलाचा मृत्यू झाला. तर इतरांची प्रकृती खालावली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
उत्तर प्रदेशातील पुरणपूर तालुक्यातील राहुल नगर मध्ये राहणाऱ्या सीमाचे लग्न डेहरादूनच्या सोनू सोबत अनेक वर्षांपूर्वी  झाले  होते सीमा आपल्या  मुलांना रोहन आणि विवेकआणि मुलगी संध्याला घेऊन माहेरी आली होती.

रात्री घरात नूडल्स आणि भात खाऊन सर्व जण झोपी गेले. काही वेळा नंतर सीमा, तिची तिन्ही मुले आणि बहीण संजू आणि वाहिनी संजनाची प्रकृती बिघडली. शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडले. घरी आल्यावर कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावली. यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले.
सीमाच्या मुलाने रोहन ने पोट दुखीची तक्रार करत पाणी प्यायला आणि झोपला काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. नंतर इतरांची प्रकृती देखील खालावली. सकाळी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे सर्वांची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळतातच आरोग्य विभागाचे दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनेक ठिकाणांहून नूडल्सचे नमुने घेतले.हजारा पोलिस स्टेशनचे प्रभारी परमेंद्र सिंह यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.पुढील तपास सुरु आहे. 

Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments