Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीड वर्षाचा चिमुकला 3 दिवस आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी उपाशी पडला राहिला

Webdunia
Gwalior News पती-पत्नीने घर बंद करून गळफास लावून आत्महत्या केली, तर दुसरीकडे आई-वडिलांच्या मृत्यूदेहाशेजारी दीड वर्षाचा चिमुरडा तीन दिवस उपाशी-तहानलेल्या अवस्थेत रडत होता. तो कधी वडिलांच्या मृतदेहाजवळ जायचा तर कधी आईचा मृतदेहाजवळ तर कधी खोलीचं दार ठोठावायचा. शेवटी ज्या खोलीत त्याच्या आईचा मृतदेह लटकला होता त्याच खोलीबाहेर तो बेशुद्ध पडला. मंगळवारी शेजारच्या तरुणांना दुर्गंधी आल्याने त्यांनी घरात डोकावून पाहिले असता चिमुकला बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला.
 
त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. शेजाऱ्याने मासूम मुलाला त्यांच्या घरी नेले. नंतर त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. तो पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील मैदई परिसरातील नियामद खान मंगळवारी त्यांच्या घरी होते. त्यांना शेजारील सोनू उर्फ ​​उर्फ नूर आलम याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी घरात डोकावून पाहिले असता हे रहस्य उघड झाले. सोनूला फाशी वर लटकलेला होता तर दीड वर्षाचा चिमुकला जाहिद दुसऱ्या खोलीच्या दारात बेशुद्ध अवस्थेत होता.
 
नियामद गच्चीतून सोनूच्या घरात उतरला. मासूमला आपल्या मांडीत घेऊन घरी आले. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना माहिती दिली. पोलिस आले तेव्हा सोनूची पत्नी शबाना हिचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सध्या दोघांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.
 
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदच्या दिवशी (शनिवारी) सोनू आणि त्याच्या आईमध्ये काही गोष्टींवरून वाद झाला, त्यानंतर सोनूची आई नात आणि नातवासोबत आपल्या मुलीच्या घरी गेली. घरात सोनू, त्याची पत्नी शबाना आणि दीड वर्षाचा जाहिद होते. यानंतर रात्री उशिरापर्यंत हे लोक दिसले, त्यानंतर परिसरातील कोणीही त्यांना पाहिले नाही. मृत सोनू उर्फ ​​नूर आलम हा व्यवसायाने हेअर सलूनमध्ये काम करायचा, त्याची पत्नी शबाना हिच्याशी रोज भांडण होत असे. दोघांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना तीन मुले आहेत.
 
ग्वाल्हेरचे सीएसपी यांनी सांगितले की, पती-पत्नीचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मुलाला रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्याची प्रकृती ठीक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments