काँग्रेसनं सोमवारी देशभरामध्ये सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केली आहे. 31 मार्चपर्यंत ही सदस्य नोंदणी चालणार असून 31 मार्चला संघटनांतर्गत निवडणुकांपर्यंत ही मोहीम सुरू असेल.
काँग्रेसच्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी ऑनलाईन या मोहिमेची सुरुवात केली. 'काँग्रेसमध्ये या, भारत वाचवा' अशा नावाने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत नागरिकांनी, घटनात्मक मूल्य नष्ट करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य यांच्या निवडींने या मोहिमेचा शेवट होणार आहे. काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी पुढील वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान निवडणुकांचं आयोजन केलं जाणार आहे.
काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारताना संबंधिताला दारु आणि ड्रग्जपासून दूर राहण्याची घोषणा करावी लागणार आहे. तसंच मर्यादेपेक्षा अधिक संपत्ती बाळणगणार नाही, असंही जाहीर करावं लागेल.