Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लेस्बियन पत्नी विरुद्ध पतीची पोलीसात तक्रार

Webdunia
बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (16:03 IST)
उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये एका पतीने पत्नीविरोधात ती लेस्बियन असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या नवऱ्याने त्याच्या पत्नीचे व त्याच्या चुलत बहिणीचे शारीरिक संबंध असल्याचा देखील दावा केला आहे. लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यानंतरच त्या पतीला त्याची पत्नी लेस्बियन असल्याचे समजले आहे.
 
या घटनेत तक्रारकर्त्या पुरुषाचे पाच महिन्यांपूर्वीच सदर महिलेशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर त्याला व त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या बायकोच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास देखील नकार देऊ लागली. तसेच नवऱ्याच्या गैरहजेरीत त्याची बायको सतत त्याच्या चुलत बहिणीच्या घरी जात असल्याचे त्यांना कळले. एक दिवस पत्नीचा पाठलाग करून नवरा व त्याचे कुटुंबीय बहिणीच्या घरी पोहोचले तेव्हा त्या दोघींना त्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचे त्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments