Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉम्बेट आर्मी एव्हीएशनचा दीक्षांत सोहळा देश सेवेसाठी हवाई दलाची तुकडी सज्ज

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (09:31 IST)
गांधीनगर येथील कॉम्बेट आर्मी एव्हीएशनचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात संपन्न झाला असून, सोहळ्याचा समारोप 'ऑपरेशन विजय' या युद्धजन्य प्रात्यक्षिकाने करण्यात आला आहे. युद्धभूमीवर लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांचे कौशल्य, जबाबदारी यावेळी अनुभवताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले होते.
प्रत्यक्ष युद्धात हवाई दलासोबतच सैन्याला देखील वेगवेगळे हेलिकॉप्टर चालवावे लागते, म्हणून सैन्यदलातील जवानांना हे विशेष हवाई प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये एअर टू एअर कॉम्बॅट, एअर टू लँड कॉम्बॅट, रेस्क्यू मिशन, विविध स्तरावर नेमके कसे काम करायचे याचे प्रशिक्षण देतात. यासाठी निवडक कॅडेट्सला 18 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण देण्यात येते.
एव्हिएशन हेलिकॉप्टर बॅच प्रदान
 
यावेळी 28 अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहेत. त्यापैकी 6 अधिकाऱ्यांना एव्हिएशन हेलिकॉप्टर बॅच प्रदान केले गेले. कॅप्टन अंकित मलीक हा सिल्व्हर चिताह ट्रॉफीचा विजेता ठरला, तर सर्वोत्कृष्ट लढाऊ वैमानिक म्हणून मेजर प्रभूप्रीत सिंग यांनी मान मिळवला आहे. पदवीदान परम विशिष्ट सेवा पदक सन्मानित लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारिया यांच्या हस्ते करण्यात आले. हा विशेष सोहळा बघण्यासाठी कॅडेट्सचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. हा सोहळा लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग सलारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे.पदवीदान सोहळ्यादरम्यान या हवाई तुकडीचे चित्तथरारक प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवण्यात आले. ज्यामध्ये ध्रुव चितासारख्या लढाऊ हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि मारक क्षमतेचा प्रत्यय आला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments