Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढच्या महिन्यापासून मुंबई ते दिल्ली अंतर १२ तासांवर

Webdunia
मंगळवार, 20 जून 2017 (11:24 IST)

पुढच्या  महिन्यापासून भारतीय रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर १७ तासांवरुन १२ तासांवर येणार आहे. राजधानी एक्स्प्रेसचा वेग ३० टक्क्यांनी वाढणार असल्याने मुंबई-दिल्ली दरम्यान प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. मुंबई-दिल्ली प्रवासासोबतच दिल्ली-हावडा प्रवासासाठी लागणारा वेळदेखील १७ तासांवरुन १२ तासांवर येणार आहे.  मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा या दोन्ही मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून ताशी २०० किलोमीटर इतका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हे दोन्ही रेल्वे मार्ग देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे मार्ग होणार आहेत. सध्या दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणारी गतिमान एक्स्प्रेस ताशी १६० किलोमीटर वेगाने धावते. भारतीय रेल्वे गाड्यांचा सरासरी वेग १०० किलोमीटर प्रति तास इतका आहे. ‘राजधानी एक्स्प्रेसचा वेग ७५ किलोमीटर प्रतितास इचका आहे. तर इतर लांब पल्ल्यांच्या गाड्या साधारणत: ५२ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. देशाती मालगाड्यांचा वेग सरासरी २२ किलोमीटर प्रतितास आहे,’ अशी माहिती रेल्वेतील एका अधिकाऱ्याने दिली.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments