rashifal-2026

हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री दैव बलवत्तर म्हणून पुन्हा बचावले

Webdunia
शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:26 IST)
पून्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी बचावले आहेत. आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याअंती  अलिबाग येथे डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत होते. अगदी त्याच वेळेस हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ अर्थात उडण्यास सुरुवात केली. यामध्ये  हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला घेतले आहे. त्यामुळे  ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले. या आगोदर लातूर येथील अपघातात ते बचावले होते. मुख्यमंत्री आता मुंबईला पोहोचले आहेत. ते सुखरूप असून खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे कार्यालयातून सांगितले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments