Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नात नाचत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 12 मे 2023 (17:10 IST)
छत्तीसगडमधील भिलाई येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. जिथे लग्न समारंभात डान्स करताना एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. मृतक आपल्या पुतणीच्या लग्नात डान्स करत होते असे सांगितले जात आहे. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि स्टेजवरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मयत दिलीप दल्ली हे राजहरा येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक अभियंता होते.  
 
52 वर्षीय दिलीप स्टेजवर पंजाबी गाण्यांवर जबरदस्त डान्स करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्यासोबत वधू-वरही नाचत आहेत. दिलीप ज्या उत्साहात नाचत होते, त्याच उत्साहात एका झटक्यात एवढा मोठा अनुचित प्रकार घडेल हे कोणालाच कळले नाही. नातेवाईकांचे म्हणणे आहे की, दिलीप हे 4 मे रोजी पुतणीच्या लग्नासाठी गावी आले होते. आनंदाच्या वातावरणात ते स्टेजवर नाचत होते. अचानक त्यांना वेदनाजाणवू लागल्याने ते स्टेजवर बसले पण थोड्या वेळाने ते खाली पडले. आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांनी त्यांना उचलून रुग्णालयात नेले, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दिलीपच्या कुटुंबात दोन मुली आणि पत्नी आहेत.  या घटनेनंतर कुटुंबियांवर वर शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

पुढील लेख
Show comments