Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPhone खरेदी करण्यासाठी 18 वर्षाच्या मुलाकडून वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या

Webdunia
बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (14:13 IST)
उत्तर प्रदेशाच्या प्रयागराज येथून  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 18 वर्षाच्या तरुणाने आयफोनच्या लालसापोटी एका वृद्ध व्यक्तीची हत्या केली. त्याने सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी पलंगाला पेटवलं त्याने या घटनेनन्तर पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथे मयत चन्द्रप्रकाश श्रीवास्तव हे घरात एकटेच राहायचे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आदित्य मौर्यशी चांगली मैत्री झाली. 

चंद्रप्रकाश यांनी घरातील एसीत बिघाड झाल्याने आदित्यला सर्व्हिस सेंटरला फोन लावण्यास सांगितले आदित्यने फोन केल्यावर सर्व्हिस सेंटरवाले जास्त पैसे घेणार असे सांगितले. या वर त्यांनी आपले बॅंकेचे पास बुक त्याला दाखवत पैसे भरपूर आहे सांगितले. 

आदित्यच्या मनात पैसे कसे मिळवता येईल हा विचार आला आणि आदित्यने चंद्रप्रकाश यांचे एटीएम चोरले आणि पिन नंबर शोधून काढला. एटीएम मधून पैसे निघाल्यावर त्यांना मेसेज येत होता. ही बाब आदित्यला समजल्यावर त्याने मोबाईल लंपास करण्याचा कट रचला आणि रात्री चंद्रप्रकाश यांच्या घरात शिरला 

आदित्यने मोबाईल चोरला मात्र टेबलावर त्याचा धक्का लागला आणि चन्द्रप्रकाश यांनी त्याला मागून धरले. आरोपी आदित्यने त्यांना जोरात ढकलले. या झटापटीत त्यांचे डोकं दाराला आपटले आणि ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. आदित्यने मृतदेह पलंगावर ठेऊन विजेच्या तारा पसरवून पेटवले नंतर दुसऱ्या दिवशी येऊन अपघात झाल्याचे भासवत पोलिसांना कळविले. पोलिसांनी शोध लावल्यावर आदित्य पर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. 
 Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments